रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 जून 2017 (07:48 IST)

श्रीपूजक ठाणेकर यांना चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच मारहाण

अंबाबाई मंदीराचे श्रीपूजक आणि नगरसेवक अजित ठाणेकर यांना गुरुवारी पुजारी हटाओ मोहिमेच्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात आलेल्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोरच मारहाण केली. महिला आंदोलकांनी त्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्यानंतर पोलिस बंदोबस्तात त्यांना बाहेर नेण्यात आले. तरीही आंदोलकांचा राग शांत झालेला नव्हता. दरम्यान. पुजारी हटाओ या मागणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिन्यात अहवाल द्यावा, असा निर्णय चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्यानंतर ही बैठक संपली.