शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 मार्च 2023 (08:42 IST)

अंबादास दानवे हे आपल्या संपर्कात…कधीही काहीही होऊ शकतं- संजय शिरसाट

sanjay shirsat
अंबादास दानवे  हे आपल्या संपर्कात असून ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील असा धक्कादायक दावा शिंदे गटाचे नेते आणि प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. आमदार शिरसाटांच्या या दाव्याने खळबळ माजली असून असं झालं तर उद्धव ठाकरेंसाठी तो मोठा धक्का असणार आहे. छत्रपती संभाजीनगर  या ठिकाणी आज शिवसेना पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा पार पडला त्या दरम्यान ते बोलत होते.
 
जाहीर मेळाव्यात संजय शिरसाट यांनी असा दावा केला की, “अंबादास दानवे माझ्या संपर्कात असून कधीही काहीही होऊ शकतं. अंबादासने मला सांगितलं बाई खूपच डोक्यावर गेली आहे. राजकारणात तुम्ही असं काही समजू नका कधीही काहीही होऊ शकतं.” असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
 
संजय शिरसाटांनी ‘ती बाई’ म्हणून अप्रत्यक्ष सुषमा अंधारे यांच्यावर टिका केली आहे. संजय शिरसाट यांच्या दाव्यामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली असल्याचे बोलले जात आहे.
 
सुषमा अंधारेंची नक्कल करताना आपल्या भाषणात संजय शिरसाट म्हणाले, “संदिपान भुमरे माझा भाऊ आहे…हा माझा भाऊ…तो माझा भाऊ असं ही बाई (सुषमा अंधारे) नेहमी बोलते. आमची ३८ वर्षे शिवसेनेत गेली आहेत आणि तू काल आली आहेस गं… तू आम्हाला शिकवणार का? ” असे विचारून अंबादास दानवे आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला. सुषमा अंधारे यांचं पक्षातलं महत्त्व वाढल्यामुळे अंबादास दानवे नाराज असल्याचे संजय शिरसाट यांनी सांगितलं.
 
Edited By - Ratnadeep ranshoor