सोमवार, 24 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 24 फेब्रुवारी 2025 (10:25 IST)

नीलम गोऱ्हे यांचा विधानावर अंबादास दानवे यांचे उत्तर तुमच्या कमाईचा तपशील द्या

महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दावा केला की शिवसेनेत (UBT) पदे पैशाने मिळवली जातात, ज्यामध्ये मर्सिडीज कार भेट म्हणून देणे देखील समाविष्ट आहे. त्या पुढे म्हणाल्या, संजय राऊतांनी मला आमदार बनवण्याचा प्रयत्न केला मी काहीही दिले नाही. पक्षाने माझ्याकडून काहीही मागितले नाही.
एक व्यक्ती म्हणून उद्धव ठाकरे हे सुसंस्कृत नेते आहे पण ते त्यांच्या वेळेचे नियोजन करू शकले नाही.
ते त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटत नाही. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना यूबीटीचे नेते अंबादास दानवे यांनी रविवारी नीलम गोऱ्हे  यांचावर टीकास्त्र सोडले आहे.
तसेच सुषमा अंधारे यांनी देखील नीलम गोऱ्हे  यांना खडेबोल सुनावले आहे. ते म्हणाले, नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत 30 वर्ष काढले आहे. आणि त्यांचा खूप प्रभाव होता. जर त्या भ्रष्टाचार झाल्याचा दावा करत आहे तर त्यांनी त्यांच्या कार्यकाळातील कमाईचा हिशोब द्यावा.त्यांना त्यांच्या दीर्घकाळच्या सहवासामुळे किती फायदा झाला आहे ते स्पष्ट करावे. 
Edited By - Priya Dixit