गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 एप्रिल 2021 (09:29 IST)

अमृता फडणवीस यांना आयुष्यात प्रथमच वय जास्त असावं वाटतंय, वाचा का

पूर्व मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमी आपल्या ट्वीटमुळे चर्चेत असतात. ट्रोलिंगला न घाबरता त्या बिनधास्त आपले विचार मांडत असतात. अलीकडे त्यांनी केलेलं ट्वीट पुन्हा चर्चेत आहे ज्यात त्यांना आपलं वयं जास्त असावं असं वाटतंय.
 
कोरोनाचा उद्रेक वाढत असून सुरक्षेसाठी वॅक्सीनेशन घेण्याचा सल्ला दिला जात आहे. बचावासाठी हा एकमेव मार्ग असल्याचे दिसत असताना सध्या तरी केवळ 45 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना लस दिली जातेय. अशात अमृता यांनी ट्विट केलंय की आज मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच माझं वय 45 वर्षे किंवा त्याहून अधिक हवं होतं असं वाटत आहे. लसीकरणाची वाट पाहत आहे.... जवळपासच्या सर्वांनाच कोरोना आहे... नव्या अवतारातला कोरोना अधिक भयावह आहे, असं अमृता यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.
 
कोरोना लसीकरण किती महत्तव आहे हे अमृता यांच्या ट्विटवरून कळून येतं कारण महिलांचा सामान्य स्वभाव स्वत:चं वय सार्वजनिकपणे जाहीर करणं कधीच नसतं. महिलांना व्यस्कर दिसणं मुळीच आवडत नसताना या पोस्टद्वारे अमृता यांनी वयापेक्षा निरोगी राहणे किती महत्त्वाचे आहे या स्थितीची जाणीव करुन दिली आहे.