शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 जुलै 2022 (21:28 IST)

भूलतज्ज्ञांसाठी नाशिकमध्ये राज्यस्तरीय युवा महाकॉन परिषद

नाशिक : भारतीय भुलशास्त्र संघटना (आयएसए) नाशिक या संघटनेच्यावतीने युवा महाकॉन २०२२ या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. २३ आणि रविवार दि. २४ जुलै या कालावधीत हॉटेल एक्सप्रेस इन येथे ही राज्यस्तरीय परिषद होणार आहे. आयएसए नाशिक ही संघटना भूलतज्ज्ञांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असते. याशिवाय सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विविध घटकांसाठी देखील संघटनेद्वारे उपक्रम राबविले जातात. यंदा पंचेचाळीस वयाच्या आतील भूलतज्ज्ञांसाठी पहिल्यांदाच अशा प्रकारची राज्यस्तरीय युवा महाकॉन परिषद आयोजीत करण्यात आली आहे. 
 
आरोग्य सुविधांमध्ये आधुनिकता येत असतानाच भूलशास्त्रही प्रगत होते आहे. आरोग्य सेवेत भुलशास्त्र आणि भूल तज्ज्ञांचे महत्व अनन्य साधारण आहे. या शास्त्रात अंतर्भाव होणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाची, उपचार प्रणालीची सर्वांना माहिती व्हावी, विशेषतः वयाच्या पंचेचाळीशीच्या आतील भूल तज्ज्ञांच्या ज्ञानाचा अन्य सहकाऱ्यानाही लाभ मिळावा, त्यांना त्यांचे विचार व अनुभव मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. या परिषदेत राज्यभरातील ३०० डॉक्टर्स सहभागी होणार असून त्यापैकी काही डॉक्टर्स त्यांचे शोध प्रबंध देखील सादर करणार आहेत. परिषदेचे उदघाटन देशातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय ओक यांच्या हस्ते होणार आहे. 
 
यावेळी आयएसए नॅशनलच्या उपाध्यक्षा डॉ. अंजली भुरे, सचिव डॉ. नवीन मल्होत्रा, संघटनेच्या राज्य अध्यक्षा डॉ. मनिषा कटीकर, सचिव डॉ. अविनाश भोसले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.