गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 ऑगस्ट 2024 (00:20 IST)

फडणवीसांच्या सांगण्यावरून परमबीरने माझ्यावर आरोप केले,अनिल देशमुखांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल

anil deshmukh
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना अटकेपासून वाचवण्याचा प्रयत्न केला. यासोबतच महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. तर भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच याला फडणवीसांना बदनाम करण्याची रणनीती असल्याचे म्हटले आहे.
 
मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शहरातील हॉटेल आणि बारमालकांकडून दरमहा 100 कोटी रुपये वसूल करण्यात मदत केल्याचा आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (शरदचंद्र पवार) देशमुख यांनी एप्रिल २०२१ मध्ये गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. याबाबत देशमुख यांनी रविवारी सांगितले होते की, फडणवीस यांच्या सांगण्यावरून बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माझ्यावर आरोप केले आहेत. 

सोमवारी नागपुरात देशमुख म्हणाले की, मी महाराष्ट्राचा गृहमंत्री असताना तपासाअंती असे आढळून आले की मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या  टाकल्या होत्या.

स्कॉर्पिओ कारचा तो खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार होता. सिंग याने त्याच्या इतर साथीदारांसह ही कारवाई केली होती. या आरोपावरून माजी पोलीस आयुक्त सिंग यांना तीन वर्षांसाठी अटक होणार होती, मात्र सिंग फडणवीस आणि केंद्र सरकारकडे गेलेअसता फडणवीसांनी त्यांना अटक होणार नाही असे आश्वासन दिले. आणि एमव्हीए सरकार पाडल्याचा आरोप करू अशी अट ठेवली. त्यामुळेच परमबीर सिंग यांनी माझ्यावर आरोप केले. 
Edited by - Priya Dixit