सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (22:50 IST)

अण्णा हजारे यांचं शेतकऱ्यांसाठीचं नियोजित उपोषण स्थगित

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांसाठीचं उपोषण स्थगित केलं आहे. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णा हजारेंची भेट घेतली आणि मनधरणी केली. यावेळी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी हेही उपस्थित होते. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अण्णांनी नियोजित उपोषण स्थगित केलं आहे.
 
दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अण्णा हजारे उपोषण करणार होते.
 
अण्णा हजारे म्हणाले, "आम्ही 15 मुद्दे केंद्र सरकारला दिले आहेत. त्या मुद्द्यांवर उच्चस्तरीय समितीमध्ये योग्य ती कारवाई होईल, असा मला विश्वास वाटतो. म्हणून उद्या होणारं उपोषण मी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे."