खोतकर यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा
शिवसेनेचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. अर्जुन खोतकर यांचं मंत्रिपद आणि आमदारकी तूर्तास शाबूत राहिलं आहे. शिवाय, खोतकरांचा मतदानाचा अधिकारही अबाधित राहिला आहे. कारण मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने खोतकरांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय दिला होता, त्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.
विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीवेळी अर्जुन खोतकर यांचा उमेदवारी अर्ज विहित वेळेनंतर भरण्यात आला, असा आक्षेप काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी घेतला होता. त्यावरील सुनावणीवेळी औरंगाबाद खंडपीठाने खोतकरांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय दिला होता.