संबंधित माहिती
- महाराष्ट्र लॉकडाऊन: ब्रेक द चेनची नवीन नियमावली जाहीर हे आहेत नवीन नियम
- HSC Board Result 2021: १२वीचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर होणार
- मृत्यूनंतर प्रेम विवाहाची इच्छा केली पूर्ण
- मोठी बातमी : दुकानांची वेळ रात्री 8 पर्यंत असणार
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी
चिखलीतील कैलास पवार या जवानाला वीरमरण
सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या चिखलीतील कैलास पवार या जवानाला वीरमरण आले आहे. सियाचीनहून आपल्या गावाकडे परतत असताना शहीद झाले. उणे ५० डिग्री तापमान असणाऱ्या खडतर ठिकाणी ते कर्तव्य बजावत होते. महार बटालियनमध्ये ऑगस्ट २०२० पासून ते कार्यरत होते. १ ऑगस्टला त्यांनी एका वर्षाची सेवा संपली होती. सियाचीनच्या बर्फाळ डोंगरावरून खाली उतरत असताना पाय घसरला आणि खाली कोसळले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी लडाखमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांना देवाज्ञा झाली.
अत्यंत खडतर कर्तव्य बजावल्यानंतर ६ महिन्यांच्या सुट्टीसाठी ते चिखलीला येणार होते. मात्र डोंगर उतरताना झालेल्या दुर्घटनेत त्यांना वीरमरण आलं. वरून खाली येताना पायीच प्रवास करावा लागतो. तेथून खाली उतरण्यासाठी चार दिवस लागतात. यावेळी पाठीवर सामनाचे ओझे घेऊन उतरावं लागतं. पाय घसरून पडल्यानंतर इतर जवानांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
