HSC Board Result 2021: १२वीचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर होणार
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाचा (HSC Result 2021) १२वीचा निकाल कधी जाहीर होणार याबाबत शक्यता वर्तवली जात होती. काल, रविवारी १२वीचा निकाल सोमवारी लागणार असल्याचे समोर आले होते. पण असे काही झाले नाही. अखेर १२वीच्या निकालाचा मुहूर्त ठरला आहे. उद्या, मंगळवारी दुपारी १२वीचा निकाल जाहीर होणार आहे. याबाबतची माहिती स्वतः राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून दिली आहे.
सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत इ.१२वी निकालासाठी सुधारित अंतर्गत मूल्यमापन प्रक्रियेत परीक्षा मंडळांचा मोठा वाटा असून त्यात शिक्षकांनी मोलाची भूमिका बजावली. ह्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आणि सहकार्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते!