बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :मुंबई , मंगळवार, 27 जुलै 2021 (19:01 IST)

Maharashtra HSC Result 2021: 12वी निकालाची तारीख लवकरच जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्डच्या बारावी 2021 परीक्षेचा निकाल (Maharashtra HSC result 2021) लवकरच जाहीर होऊ शकतो. दरम्यान, अद्याप निकालाची तारीख झालेली नाही. मात्र, ज्या दिवशी निकाल जाहीर होईल त्याच्या काही तास आधी बोर्डाकडून पत्रकार परिषद घेऊन निकालांची विभागवार माहिती दिली जाईल. त्यानंतर दुपारी एक वाजेच्या सुमारास mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर बोर्डाकडून निकाल जाहीर केला जाईल. येईल.
 
बारावीच्या विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पाहता येणार:
www.maharashtraeducation.com आणि www.examresults.net/maharashtra या दोन वेबसाइटवर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. याशिवाय mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर देखील निकाल पाहता येईल. यासाठी विद्यार्थ्यांना आपला सीट नंबर आणि आईचे नाव टाकावे लागणार आहे.
HSC Result 2021: निकाल या वेबसाइटवर पाहता येणार (List of Websites for Result)
mahresult.nic.in
result.mh-ssc.ac.in
examresults.net
indiaresults.com