सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: बुधवार, 7 जुलै 2021 (07:09 IST)

पावसाळ्यात रंगकाम करताना खालील बाबी लक्षात ठेवाव्यात

पावसाळ्यात रंगकाम करताना हे बरंच जिकिरीचं काम. रंगाचा वास, घरभर धूळ, पसारा, सामानाची बांधाबांध, हलवाहलवं आणि नंतर आवराआवर. नुसत्या विचारानंच नकोस वाटतं. अखेर आज काढू, उद्या काढू असं म्हणता म्हणता काहींना ऐन पावसळ्यात रंग काढण्याचा मुहूर्त गसवतो. मग सतराशे साठ कॅटलॉग्स डोळ्यांखालून घातले जातात. रंगाचे प्रकार, रंगसंगती ठरवल्या जातात. तरीही पावसाळ्यात रंगकाम करताना खालील बाबी लक्षात ठेवाव्यात.
 
ऑइल पेंट लवकर सुकत नाही. त्यामुळे काढताना थोडीशी काळजी घ्यावी.
 
रंग ओला राहिल्यामुळे त्यावर बुरशी पकडते. याचं भान राखून रंग काढावा.
 
पासवसाळ्यात भिंतीना ओलावा येतो. या ओलाव्यामुळे भिंतीना केलेला गिलावा, लांबी ओली राहिल्यामुळे कालांतराने रंगाचे पापुद्रे सुटतात. त्यामुळे रंग निघून जातो.
 
या दिवसात घराला, इमारतींना बाहेरून रंगकाम करणं अधिक हितावह असतं. कारण बाहेरचं रंगकाम शक्यतो सिमेंट पेंटमध्ये करतात. त्यासाठी संपूर्ण बिल्डिंग धुवून, घासून घ्यावी लागते. कारण पावसाळ्यात इमारतीच्या बाहेरील भागावर शेवळसदृश वनस्पती पकडलेली असते. त्यामुळे तिला घासून साफ केल्यामुळे इमारतीचा भाग व्य‍वस्थित साफ होतो. त्याला रंगही चांगल पकडतो. त्यासाठी खूप पाण्याचीही आवश्यकता असते. तसंच सिमेंट पेंटला एका कोट केल्यावर दुसरा कोट करण्यापूर्वी त्याव र पाणी मारणं आवश्यक असतं. कारण सिमेंट पेंटवर पाणी न मारल्यास उन्हामुळे तापून रंगाची भुकटी पडू लागते. त्यामुळे पावसाळा संपत आला असताना बाहेरील रंगकाम केल्यामुळे पाण्याची बचत होते. रंगकामाला आवश्यक असलेला ओलावा इमारतींच्या भिंतींना या मोसमात नैसर्गिक‍रीत्या मिळतो. त्यामुळे रंग वर्षभर टिकतोही.
 
पाऊस कमी झाल्यावर इमारतीला बाहेरच्या बाजूने रंगकाम करताना प्लास्टर करावं. त्यानंतर रंगकामाला सुरुवात करावी. त्यामुळे इमारतींतून होणार्‍या गळतीला अटकाव होतो. इमारतीच्या भिंतीचं आयुष्य वाढतं. लोखंडी सळ्या, खांबांना गंज पकडत नाही.