गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 मार्च 2021 (09:23 IST)

रेखा जरे हत्याकांड ! मुख्य सूत्रधार बाळ बोठेला पोलिस कोठडी

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला पारनेर न्यायालयाने २० मार्चपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. तब्ब्ल १०२ दिवसानंतर अहमदनगर पोलिसांनी शनिवारी हैदराबाद येथून बोठे ला अटक केली. हत्येच्या घटनेवेळी बाळ बोठे हा सकाळ वृत्तपत्राचा अहमदनगर आवृत्तीचा कार्यकारी संपादक होता.
 
न्यायालयाकडे सरकारी वकील सिध्दार्थ बागले यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. गेल्या तीन महिन्यांपासून बोठे का फरार होता. त्याला तीन महिन्यात कोणी मदत केली. तसेच रेखा जरे यांची हत्या त्याने का केली, याचा तपास व्हायचा आहे. त्यानुसार न्यायालयाने बोठेला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
 
बोठे मदत करणारे आंध्र प्रदेशातील जनार्दन चंद्राप्पा, राजशेखर चाकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल आरीफ व महेश वसंतराव तनपुरे (रा. नवलेनगर, सावेडी, अहमदनगर) यांनाही अटक केल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी (रा. हैदराबाद) ही महिला आरोपी अद्याप फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
 
रेखा जरे यांची ३० नोव्हेंबरला सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील सुप्याजवळील जातेगाव घातात गळा चिरून हत्या झाली होती. या घटनेनंतर काही तासांमध्येच पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती.