मुंबई महाराष्ट्राचीच राहिल, महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आज विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री यांनी राज्य सरकारच्या एका वर्षाच्या कार्यकाळाचा आढावा घेत भाषण दिले. ते म्हणाले, गेल्या वर्षभरापासून राज्य सरकार ने येणाऱ्या अनेक आव्हानांचा सामना समर्थपणे केला असून महायुतीतील तिन्ही नेत्यांनी एकत्र निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि करत आहोत.
महापालिका निवडणुका लवकरच येणार आहे. या निवडणुकीच्या दीर्घ कालावधीनंतर स्थानिक स्तरावर कार्यरत कार्यकर्त्यांचा त्रास दूर होईल आणि लोकशाहीची पायाभरणी प्रत्येक स्तरावर होऊन महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल.
निवडणुका आणि विकासाच्या अजेंड्यावर भर देत त्यांनी पुढील काळात 2035 चा अमृत महोत्सवी महाराष्ट्र घडवण्याचे ध्येय सांगितले.
2035 चा अमृत महोत्सवी महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे. पुढचा काळ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. रचनात्मक कार्यातून आपण महाराष्ट्राला वेगाने पुढे नेऊ शकतो.
विरोधी पक्ष आहे, सत्तारुढ पक्ष हे जरी असलं तरीही आपण सगळे महाराष्ट्र हिताचा विचार करणारे लोक आहोत, म्हणून मला सांगायचं आहे की अब आगे बढ़ चुक हूँ मै, पिना था जितना जहर पी चूका हूँ मै, अब पग नहीं रुकनेवाले, आगे चल चुका हूँ मै, जितना पढना था तुमको पढ़ चुका हूँ में, अब आगे बढ़ चुका हूँ. असे फडणवीस म्हणाले.
मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल वगैरे कुणीही शंका मनात बाळगू नये. निवडणुका आल्या की अशी टीका केली जाते. मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहिल.
Edited By - Priya Dixit

