गुरूवार, 4 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 डिसेंबर 2025 (15:21 IST)

लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण

Ladki Bahin Scheme
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे एक वर्ष पूर्ण झाले आहे
विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेली ही सरकारी योजना महिला वर्गात प्रचंड लोकप्रिय ठरली. ही योजना लाडक्या बहिणींसाठी सुरु करण्यात आली. विरोधकांनी योजना बंद होणार असल्याच्या अफवा पसरवल्या होत्या, मात्र मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, मी असे पर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही.
या योजने अंतर्गत महिलांना दर महिन्याला खात्यात थेट 1500 रुपये जमा केले जाते. या जोजने अंतर्गत ज्या कुटुंबांचे वार्षिक आर्थिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना पैसे दिले जाते. योजना सुरूच राहणार, बंद होणार नाही – मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती.
लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर, सरकारने आता लखपती दीदी’ योजनाची घोषणा केली आहे. या योजनेमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला आणि सक्षमीकरणाला बळ मिळेल. आणि या बातमीमुळे लाडक्या बहिणी खुश झाल्या आहेत.
महिलांना केवळ आर्थिक मदत न देता, त्यांना कौशल्य प्रशिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, जेणेकरून त्यांचे वार्षिक उत्पन्न किमान एक लाख रुपयांपर्यंत पोहोचावे. हा थेट महिला सशक्तिकरण कार्यक्रम आहे.
Edited By - Priya Dixit