शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 15 जून 2021 (19:29 IST)

अनलॉक ला सहज घेऊ नका ,या 10 गोष्टी लक्षात ठेवा

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होत आहे. देशातही अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.परंतु दुसऱ्या लाटेची भीती जनता विसरली आहे, म्हणूनच देशाच्या ज्या राज्यात,ज्या क्षेत्रात अनलॉक झाले आहे तिथे सामाजिक अंतर राखले जात नाही,लोकांचे मास्क देखील तोंडाच्या खाली आले आहेत. या कोरोनाची भीती तेच लोक जाणू शकतात ज्यांनी या साथीच्या रोगात आपली  माणसं गमावली आहेत.
सामान्य शब्दात असे ही म्हणू शकतो ,की सावधगिरी दूर झाली आक्रमण वाढला.हीच परिस्थिती पुन्हा येऊ नये.म्हणून जर आपण बाजारात जात असाल तर या 10 गोष्टीना लक्षात ठेवा. 
 
1 बाजारात जाताना डबल मास्क लावा ,सामाजिक अंतर राखा आणि सेनेटाईझर चा वापर करा.
 
2 खूपच आवश्यक असेल तरच बाजारात जावं . जेणे करून संसर्गात अडकू नये.
 
3 आपल्या घरात लहान मुले किंवा गर्भवती स्त्री असल्यास त्यांच्या संपर्कात येऊ नका.अंतर ठेवा.
 
4 संक्रमणाचा धोका अद्याप टळलेला नाही, म्हणून कोविड - 19 च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा.
 
5 लसीकरणानंतरही कोविड -19 च्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
 
6 बाजारातून सामान आणल्यावर त्याला सेनेटाईझ करा. फळ आणि भाज्या कमीत कमी दोनदा तरी स्वच्छ पाण्याने धुवा.
 
7 मेट्रो सिटीत आणि शहरात ,जिल्ह्यात शासनाने होम डिलिव्हरी सुविधा पुरविली आहे त्याचा पुरेपूर उपयोग घ्या.
 
8 कोविड -19 चे प्रकरण कमी झाल्यानंतरही, डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक सूचनाानुसार, कमीत कमी 30 सेकंद आरामात आपले हात धुवा.
 
9 लसीकरणानंतरच बाहेर पडा. कुटुंबात मधुमेह असल्याने पूर्वीपेक्षा अधिकच सावधगिरी बाळगा.
 
10 लसीकरणाच्या दुप्पट डोसानंतरही कोविड होऊ शकतो, म्हणून गर्दीत जाणे टाळा .जेणेकरून स्वता सुरक्षित राहाल आणि आपले कुटुंबसुद्धा सुरक्षित राहील.