सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 जून 2021 (20:13 IST)

दिलासादायक बातमी !राज्यातील या जिल्ह्यात निर्बंध शिथिल करून ,अनलॉक केले जातील

सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याचे दिसत आहे त्यामुळे ब्रेक द चेन या अंतर्गत राज्यातील काही जिल्ह्यात नागरिकांना मोठा दिलासादायक बातमी समोर येत आहे.राज्य सरकार ने सांगितल्या प्रमाणे जिल्ह्यातील आठवड्याच्या कोरोनाच्या स्थितीला बघता 5 स्तरीय नियमावलीत येत्या 14 जून पासून बदल  होण्याचे संकेत मिळत आहे.ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची सक्रिय प्रकरणे कमी असतील आणि 25 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले असतील अशा जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात येतील.ते जिल्हे अनलॉक केले जातील.
 
हे स्तर खालील प्रमाणे असणार- 
1 पॉझिटिव्हीटी दर 5 टक्के तर ऑक्सिजन बेडची संख्या  25 टक्केपेक्षा कमी भरलेलं असावी 
 
2 पॉझिटिव्हीटी दर 5 टक्के तर ऑक्सिजन बेड 25 ते 40 टक्के दरम्यान भरलेले असावेत
 
3 पॉझिटिव्हीटी दर 5 ते 10 टक्के असावा. तर ऑक्सिजन बेड 40 टक्क्यांपेक्षा अधिक भरलेले असावे.
 
4 पॉझिटिव्हीटी दर 10 ते 20 टक्के असावा आणि ऑक्सिजनच्या बेडची  60 टक्के भरलेले असावे.
 
5 पॉझिटिव्हीटी दर 20 टक्क्याच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असावे.
 
अहमदनगर,अमरावती,भंडारा,बुलढाणा,चंद्रपूर,धुळे,गौंडिया,जालना,जळगाव,लातूर,परभणी,नांदेड,नागपूर,, नंदुरबार,वर्धा,वाशीम,सिंधुदुर्ग आणि यवतमाळ हे जिल्हे अनलॉक होण्याची शक्यता आहे.

हे जिल्हे पहिल्या स्तराचे आहेत.
अहमदनगर- पॉझिटिव्हिटी रेट 2.63 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण- 12.77 टक्के
चंद्रपूर – पॉझिटिव्हिटी रेट 0.87 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-4.95 टक्के
धुळे- पॉझिटिव्हिटी रेट 1.64 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-2.15 टक्के
गोंदिया- पॉझिटिव्हिटी रेट 0.83 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-1.87 टक्के
जळगाव- पॉझिटिव्हिटी रेट 1.82 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण – 13.98 टक्के
जालना- पॉझिटिव्हिटी रेट 1.44 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-5.29 टक्के
लातूर- पॉझिटिव्हिटी रेट 2.43 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-8.66 टक्के
नागपूर – 3.13 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-3.93 टक्के
नांदेड- 1.19 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण- 2.5 टक्के
यवतमाळ- 2.91 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-9.01 टक्के
 
हे दुसऱ्या स्तरांमधून पहिल्या स्तरावर जाणारे आहे.
नंदुरबार- 2.06 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-6.19 टक्के
हिंगोली- पॉझिटिव्हिटी रेट 1.20 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-6.77 टक्के
 
हे सर्व तिसऱ्या स्तरातील पहिल्या स्तरावर गेलेले जिल्हे आहेत.
अमरावती- पॉझिटिव्हिटी रेट 4.36 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण- 16.57 टक्के
भंडारा पॉझिटिव्हिटी रेट 1.22 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण- 1.60 टक्के
वाशिम- 2.25 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-9.01 टक्के
वर्धा- 2.5 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-1.57 टक्के
परभणी- 2.30 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-12.5 टक्के
सोलापूर- 3.43 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-14.66 टक्के
 
बुलढाणा पॉझिटिव्हिटी रेट 2.37 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-9.03
हा जिल्हा चवथ्या स्तरावरून पाहिल्यावर जाण्याची दाट शक्यता आहे.
 
दुसरे स्तर- पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान भरलेले असावेत.
हे सर्व जिल्हे दुसऱ्या स्तरावरील आहे.
अकोला 5.37 टक्के ऑक्सिजन बेड व्यापलेले : 19.02
औरंगाबाद 5.35 ऑक्सिजन बेड व्यापलेले 10.86
बीड 5.22 ऑक्सिजन बेड व्यापलेले: 11.35
उस्मानाबाद 5.16 ऑक्सिजन बेड व्यापलेले 8.13
नाशिक : 7.12 ऑक्सिजन बेड व्यापलेले 14.71
ठाणे: 5.92 ऑक्सिजन बेड व्यापलेले 12.78
मुंबई : 4.40 ऑक्सिजन बेड व्यापलेले 27.12
 
 
* तिसरे स्तर : पॉझिटिव्हीटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले असावे.

हे सर्व जिल्हे तिसऱ्या स्तरावरील आहे.
पुणे 11.11 ऑक्सिजन बेड व्यापलेले 13
रायगड 13.33 ऑक्सिजन बेड व्यापलेले 21.32
रत्नागिरी: 14.12 ऑक्सिजन बेड व्यापलेले 48.75
सातारा 11.30 ऑक्सिजन बेड व्यापलेले 41.06
सिंधुदुर्ग: 11.89 ऑक्सिजन बेड व्यापलेले 51.59
 
* चवथे स्तर-  पॉझिटिव्हीटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांच्या वर व्यापलेले असतील तर
कोल्हापूर 15.85 ऑक्सिजन बेड व्यापलेले :67.41 हे चवथ्या स्तरातील जिल्हे आहे.