शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 14 जून 2021 (12:31 IST)

पुण्यात आजपासून काय सुरू, काय राहणार बंद, जाणून घ्या नवीन नियामवली

पुणेकरांना आजपासून जरा दिलासा मिळणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यामुळे येथे आजपासून निर्बंध हटवण्यात आले आहे. पुण्यात आजपासून दुकानं संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तर हॉटेल्स, बार आणि रेस्टरंट रात्री 10 वाजेपर्यंत खुली राहणार आहे.
 
पुण्यात कोरोनाचा संसर्ग दर 5 टक्कांपेक्षा कमी आल्याने आणि ऑक्सिजन बेडसची संख्या पुरेशी असल्याने सूट देण्यात येत आहे.
नवीन नियमावली
सर्व प्रकारची दुकाने सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत खुली राहतील. 
हॉटेल्स बार, रेस्टारंट रात्री 10 पर्यंत सुरू राहतील 
पार्सल सुविधा रात्री 11 पर्यंत सुरू असेल.
मॉल्स, थिएटर्स, नाट्यगृह पन्नास टक्के क्षमतेनं खुली राहणार. 
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी निर्बंध. 50 लोकांच्या उपस्थितीत 7 वाजेपर्यंत कार्यक्रम आयोजित करायला परवानगी.
लेव्हल 5 असलेल्या ठिकाणी जायण्यासाठी ई-पास आवश्यक असणार. 
शासकीय कार्यालये 100 टक्के क्षमतेने सुरू. 
खाजगी कार्यालयं मात्र 50 टक्के क्षमतेने सुरू.
वाचनालयं, क्लासेस देखील सुरू. 
उद्याने आणि स्पोर्ट्स देखील दोन वेळा खुली ठेवण्यास परवानगी.
उद्याने सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत खुली राहणार आहे.  
स्पोर्ट्स, क्रीडांगणे देखील सकाळी 5 ते 9 संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत खुली राहणार.
अभ्यासिका, वाचनालये 50 टक्के क्षमतेने संध्याकाळी 7 पर्यंत सुरू राहणार.
मात्र, शहरात संचारबंदी रात्री 10 पासून सुरू होईल
 
अत्यावश्यक सुविधा वगळता इतर दुकाने शनिवारी ,रविवारी  मात्र बंद राहणार आहे. इतर दुकाने आणि हॉटेल्सच्या या विकेंड लॉकडाऊन बाबत पुढील शुक्रवारी 18 जून रोजी आढावा घेतला जाणार आहे.