शनिवार, 17 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 फेब्रुवारी 2017 (17:26 IST)

मुंबईत काहींची फुटपट्टी एवढी वाढ झाली - आशिष शेलार

ashish shelar
राज्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी मुंबई महापालिकचे निकाल हाती येत आहे.  भाजप हा तब्बल 81 जागांवर आघाडी असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, याच परिस्थितीवर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया देत मुंबईत भाजपचा हा दणदणीत विजय असल्याचे म्हटले आहे. मुंबईतील भाजपच्या विजयाविषयी बोलताना त्यांनी यावेळी शिवसेनेवर टीकादेखील केली. मुंबईत भाजपची पटींमध्ये वाढ झाली असून काहींची फुटपट्टी एवढी वाढ झाली असल्याचे सांगत शेलारांनी शिवसेनेला टोला लगावला.