शुक्रवार, 2 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (21:31 IST)

रश्मी ठाकरे ठाण्यात, टेंभी नाका जय अंबे देवीचे घेतले दर्शन

rashmi thackeray
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात  समर्थकांनी जोरदार स्वागत केलं. ठाण्यात दाखल होताच रश्मी ठाकरे यांनी आनंद आश्रम इथल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं. त्यानंतर रश्मी ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्या टेंभी नाका इथल्या देवीच्या दर्शन घेतलं. मानाची देवी अशी ठाण्यातील टेंभी नाका जय अंबे देवीची ओळख आहे. स्वर्गीय आनंद दिघे यांनी टेंभी नाका जय अंबे देवीची स्थापना केली होती.
 
रश्मी ठाकरे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली तसंच खणा-नारळाने ओटी भरण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या. 

Edited by : Ratnadeep Ranshoor