बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 डिसेंबर 2016 (14:33 IST)

गाडी घुसली ए टी एम रांगेत १० गंभीर जखमी

नोटा बदलण्याची रांग या न त्या कारणाने नागरिकांच्या जीवावर उठली आहे.काही नागरिकांच्या रांगेत मृत्यू झाला असे असताना, नोटा काढण्यासाठी महाराष्ट्रातील  सोलापुरात एटीएमच्या रांगेत भरधाव कार घुसली आहे. तर या  बेजाबदार चालकाच्या अश्या अपघाताने   रांगेतील दहा जणंना उडवलं आहे. सोलापूर येथील  विजापूर रोडवरील आतारनगरमध्ये ही घटना घडली आहे. 
 
इंडियन बँकेच्या एटीएमबाहेर पैसे काढण्यासाठी मोठी रांग लागली होती. परंतु मद्यप्राशन केलेल्या कार चालकांचं नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट गर्दीत घुसली होती.
 
यानंतर लोकांनी कार चालकाची मनसोक्त आणि जबर चोप दिला आहे. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. विजापूर रोड पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.घटनेत दहा जण जखमी झाले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी गुन्हे नोंद केली आहे.