रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 फेब्रुवारी 2022 (21:17 IST)

अल्पवयीन मुलीवर मामेभावाकडूनच अत्याचार

वर्धा जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. हिंगणघाट पोलीस  ठाण्यांतर्गत गावात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच घरात राहणाऱ्या मामेभावाने अत्याचार केला.  या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आले आहे.
 
हिंगणघाट पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार एका गावातील पीडित अल्पवयीन मुलीचा मामेभाऊ तिच्याच घरी राहत होता.घरातीलच असलेल्या मामेभावाने कधी मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले हे घरच्यांना कळलंच नाही. मात्र मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले.डॉक्टरांच्या उपचारानंतर मुलगी 3 महिन्याची गरोदर असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला. डॉक्टरांनी पीडितेच्या आई वडिलांना माहिती देताच पायाखालची वाळू सरकली. घटनेचा गांभीर्य लक्षात घेताच डॉक्टरांनी हिंगणघाट पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी तात्काळ घटनेचे दखल घेत या प्रकरणाची चौकशी करत आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्या अंतर्गत (पास्को)गुन्हा दाखल केला असुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.