शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 ऑगस्ट 2017 (17:43 IST)

औरंगाबाद महापालिका : ‘वंदे मातरम’ म्हणण्यावरुन गोंधळ

औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ‘वंदे मातरम’ म्हणण्यावरुन प्रचंड गोंधळ झाला. यावेळी एमआयएमचे नगरसेवक जागेवरच बसून राहिल्याने शिवसेनेने त्यांच्यावर आक्षेप घेतला. नगरसेवकांच्या गोंधळामुळे सभा सुरु झाल्यानंतर दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली. यादरम्यान, सभागृहात माईकची तोडफोड आणि नगरसेवकांचा एकमेकांना धक्काबुक्कीचा प्रकारही घडला. दरम्यान, एमआयएम आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एका नगरसेवकाला दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले आहे.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची सुरुवात ‘वंदेमातरम’ म्हणून होते. मात्र ‘वंदे मातरम’ सुरु असताना एमआयएमचे दोन नगरसेवक जागेवर बसून होते. यावर शिवसेना नगरसेवकांनी आक्षेप घेत आक्रमक पवित्रा घेतला. ‘इस देश मे रहना होगा, तो वंदे मातरम कहना होगा’ अशी घोषणाबाजी करीत शिवसेना, भाजप नगरसेवक आक्रमक झाले होते.