मंगळवार, 11 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 मे 2017 (09:33 IST)

अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या ठकसेनाला अटक

aurangabad police arrested ganesh borse

भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्र्यांचा अत्यंत जवळचा असल्याचे सांगत अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या गणेश बोरसे या ठकसेनाला अखेर औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे. गणेश बोरसेला पकडण्यासाठी खुद्द दानवेंनीच सापळा रचला आणि एका लग्न समारंभात पकडून त्यांनी गणेशला पोलिसांच्या ताब्यात दिलं. गणेश बोरसेनं फक्त पैसैच वसूल केले नाहीत, तर मुख्यमंत्र्यांच्या नावाचं लेटरहेड तयार करुन अनेकांना बनावट ऑर्डरही वितरीत केल्या. बदली करुन देणे, अडकलेले सरकारी काम करुन देणे, सरकारी नियुक्ती करून देणे. ही काम करून देतो असं सांगत गणेशनं अनेकांकडून पैसै उकळले होते. अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना देखील त्यानं गंडवलं होतं.अनेकांकडून पैसे उकळून त्यानं आतापर्यंत कोट्यवधी रुपये जमावल्याची माहिती पोलिसांनी दिली.