गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 मे 2017 (17:06 IST)

Aurangabad : वाहतूक पोलिस आणि दुचाकीस्वारामध्ये हाणामारी

aurangabad traffic police beats two wheeler rider

रंगाबादमध्ये वाहतूक पोलिस आणि दुचाकीस्वारामध्ये हाणामारी झाली आहे. आकाशवाणी चौकात ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकीस्वाराला पोलिसांनी अडवलं. मात्र या तरुणांनी पोलिसांसमोर अरेरावी सुरु केली. इतकंच नाही, तर त्यांनी वाहतूक पोलिसांवर हातही उचलल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसांनाही या तरुणांना चांगलाच धडा शिकवला. विशेष म्हणजे ही घटना कॅमेरात कैद झाली आहे. हाणामारीच्या प्रकारानंतर दोन तरुण पळून गेले आहेत. पोलिसांकडून या तरुणांविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. तसंच त्यांची दुचाकीही जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.