बुधवार, 8 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified सोमवार, 7 जून 2021 (16:29 IST)

बाळासाहेब थोरात यांनी घेतली शरद पवार यांची भेट

काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत राजकीय सद्यस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज अचानक शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही भेट झाली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितलं जात आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी निवासस्थानी विविध पक्षांचे नेते येत आहेत. आज बाळासाहेब थोरात देखील पवारांची भेट घेतली.
 
दरम्यान, 'सिल्वर ओक'कडे आता राज्याचे लक्ष वेधले जात आहे. याठिकाणी राजकीय नेत्यांच्या भेटीचा सिलसिला सुरु झाल्याचे दिसून येत आहे. आधी राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांची भेट घेतली.