रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 सप्टेंबर 2023 (16:39 IST)

Baramati Accident : कारच्या धडकेत 2 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Baramati Accident :बारामती तालुक्यात जळगाव कडेपठार येथे भरधाव वेगातील येणाऱ्या एका चारचाकीने तीन शाळकरी मुलांना धडक दिली. या अपघातात दोन मुलांचा मृत्यू झाला ओंकार संतोष खांडेकर आणि रुपेश अमोल खांडेकर असे या मयत मुलांची नावे आहे. इयत्ता दहावीत हे शिकत होते. तर या अपघातात इयत्ता पाचवीत शिकणारा संस्कार संतोष खांडेकर गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर बारामतीच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.  

बारामतीत एका रस्ते अपघाताने दोन शाळकरी मुलांचा बळी घेण्याच्या घटनेमुळे बारामतीत खळबळ उडाली आहे. सकाळी दररोज प्रमाणे ही मुले शाळेला निघाली असता बारामती तालुक्यातील जळगाव कडेपठार गावात पुणे बारामती रस्त्यावर मोरगाव कडून बारामतीकडे भरधाव वेगाने धावणाऱ्या एका कारने तीन शाळकरी मुलांना धडक दिली असून या तिघांपैकी दोघांचा मृत्यू झाला तर एक जखमी झाला आहे. जखमीला स्थानिकांनी बारामतीच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे. 

Edited by - Priya Dixit