मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (16:21 IST)

रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण

नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील एका रूग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. हा संपूर्ण प्रकार रुग्णालयात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे
 
रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या महिला रुग्णाचा अहवाल देण्यास नकार दिल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रात्रीच्या वेळी रुग्णालयात शिरून डॉक्टरांना बेदम मारहाण, शिवीगाळ केली. शहरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांनी मूक मोर्चा काढून शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.