रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 ऑक्टोबर 2022 (13:08 IST)

अंत्यसंस्कारपूर्वी तरुण अचानक तिरडीवरुन उठला

Funerals
अकोल्यातील पातूर तालुक्यातल्या विवरा गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे घडलेल्या एका विचित्र घटनेत एक तरुण तिरडीवरुन उठून बसला. 
 
तरुणाला मयत झाला म्हणून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी घेऊन जात असताना हा प्रकार घडला. तो तरुण चक्क तिरडीवरून उठून बसल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली.
 
प्रशांत मेसरे असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. 21 वर्षीय तरुणाची अंत्यसंस्काराची तयारी करुन स्मशानभूमीत नेत असताना हालचाल जाणवली. तेव्हा अंत्यसंस्कार यात्रा थांबवली तर हा तरुण उठून बसल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
 
दरम्यान हा प्रकार बघण्यासाठी लोकांनी चांगलीच गर्दी देखील केली. गर्दी हटवण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. पोलिसानी त्या तरुणाला ताब्यात घेतले असून त्यावर काळी जादू केल्याचे कुटुंबानी दावा केला आहे.