रेस पूर्ण करणारे पहिलेच भारतीय बनण्याचा मिळवलाय मान
नाशिकचे सायकलीस्ट लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू आणि दर्शन दुबे यांनी रेस अराउंड ऑस्ट्रिया ही युरोपातील सर्वात अवघड अशी स्पर्धा पूर्ण केल्यानंतर त्यांचे नाशिक सायकलीस्ट शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. रेस अराउंड ऑस्ट्रिया ही स्पर्धा पूर्ण करणारे ते पहिले भारतीय असून नाशिकच्या शिरपेचात अजून एक तुरा खोवला आहे.
पाथर्डी फाटा येथील शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करत त्यांचे आशीर्वाद पन्नू आणि दुबे यांनी स्वागतचा स्वीकार केला. यावेळी नाशिक सायकलीस्टचे शैलेश राजहंस, नाना फड, डॉ. मनीषा रौंदळ, डॉ. नितीन रौंदळ आणि पन्नू आणि दुबे यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी त्याना पुढील वाटचालीसाठी सदिच्छा देण्यात आल्या.