शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 सप्टेंबर 2023 (17:47 IST)

Bhusawal : तिहेरी हत्याकांडाने भुसावळ हादरले

murder
भुसावळ मध्ये 24 तासांत तिहेरी हत्याकांडाने भुसावळ हादरले आहे. भुसावळ तालुक्यात दोन सख्ख्या भावंडाची हत्या करण्यात आली असून आता 24 तासांच्या आत कुविख्यात गुन्हेगार निखिल राजपूतची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे भुसावळ जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.  
 
भुसावळ तालुक्यात कंडारी गावात दोन सक्ख्या भावंडांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. शांताराम भोलानाथ साळुंखे व राकेश भोलानाथ साळुंखे असे या मयत भावांची नावे आहे. या भावांची हत्या शुक्रवारी रात्रीच्या सुमारास केली. 
 
तर या घटनेला अद्याप 24 तास देखील झाले नाही तर जिल्ह्यात गुन्हेगार निखिल राजपूतची 
वादातून हत्या करण्याची घटना घडली आहे. गुन्हेगार निखिल यांचावर पोलिसांना धमकी देणे, खंडणी वसूलणे, मारहाण करणे, पोलिसांच्या अंगावर हात टाकणे सारखे गुन्हा दाखल केले होते. शुक्रवारी रात्री निखिल घरी आल्यानन्तर श्रीराम नगरातील पाण्याच्या टाकीच्या टेरेसवर  काही संशयितांसोबत झोपलेला असता त्याचा त्यांच्याशी वाद झाला. कौटुंबिक वादातून गळ्यावर चाकूचे सपासप वार करून त्याचे खून करण्यात आले. 
 
पोलिसांना घटनेची माहिती मिळतातच घटनास्थळी ते दाखल झाले त्यात त्यांना रक्ताच्या थारोळ्यात निखिल पडलेला दिसला. पोलिसांनी त्याचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले असून एका संशयिताचे नाव समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्ह्याची नोंद केली असून तपास सुरु आहे. 



Edited by - Priya Dixit