भाजप उमेदवारी पुन्हा वादात, पैसे मागत असल्याचा एमएमएस व्हायरल
नाशिकमध्ये भाजपा उमेदवारी पुन्हा वादात अडकली असून आता तर एक स्टिंग म्हणजेच एक एमएमएस व्हायरल झाला आहे. तिकिट वाटपावेळी निष्ठावंताना डावलुन आयारामाना संधी दिल्याचा आरोप करण्यात आला. याला आता बळ मिळताना दिसत आहे.पक्षाच्या कार्यालयात बसुनच प्रत्येक उमेदवाराकडुन पदाधिकारी पैसे मागत असल्याचा एक व्हिडीयोच समोर आला आहे .
या व्हिडीयोत पक्षाचे पदाधिकारी नाना शिलेदार आणि त्यांचे सहकारी अरुण शेंदुर्णीकर मेदवाराला दिड ते दोन लाख रुपये तात्काळ भरा अस सांगत आहेत. नाना शिलेदार यासोबत असलेले अरुण शेंदुर्णीकर मात्र हे पैसे चेकनेही चालतील असं म्हणताय. पण हा पैसा नेमका कश्यासाठी ? हे काही स्पष्ट होत नाहीये.