बुधवार, 28 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

विदर्भात भाजपची आघाडी कायम

विदर्भात भाजपची आघाडी कायम
विदर्भातल्या नऊपैकी आठ नगर पालिकांचे पूर्ण निकाल हाती आले आहेत. यामध्ये  भाजपानं 73 जागा मिळवत एक क्रमांक राखला आहे. यामध्ये नागपुरातील 9 पैकी 5 जागांवर भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. तर काँग्रेस 1 आणि इतर 3 जण निवडून आले आहेत. काटोल येथे विदर्भ माझाने आपला खाते उघडले आहे.

विदर्भ माझाने इथं एकहाती सत्ता मिळवली आहे.  विदर्भातल्या जवळपास 185 जागांपैकी 153 जागांचे निकाल जाहीर झाले असून, त्यात भाजपनं आघाडी घेतली आहे. तर नव्या दमाच्या विदर्भ माझा पक्षानंही चांगलं यश संपादन केलं आहे. भाजपच्या खालोखाल काँग्रेस आणि विदर्भ माझाला जागा मिळाल्या आहेत.त्यामुळे विधर्भ सध्या तरी भाजपाच्या हातात आहे असे चित्र आहे.