मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (22:07 IST)

ओबीसी आरक्षणावरून भाजप आक्रमक, राज्यात जोरदार आंदोलन करणार

BJP is aggressive on OBC
महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाच्या पाठित खंजीर खुपसला असून सर्व पक्षांची मदत असतानाही महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात आलं असा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे  यांनी केला आहे.
 
चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ओबीसी आरक्षणासाठी उद्या राज्यात जोरदार आंदोलन करण्यात येईल. एक हजार ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार असल्याने त्यांनी संतापही व्यक्त केला. नागपुरात सहा ठिकाणी आंदोलन होईल असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि इतर भाजप नेते या आंदोलनता सहभागी होतील, असं सांगतानाच जोपर्यंत ओबीसींना न्याय मिळत नाही. तोपर्यंत भाजप आंदोलन करतच राहणार, तसंच राज्यातील मंत्र्यांना ओबीसी समाज रस्त्यावर फिरु देणार नाही असा इशाराही बावनकुळे यांनी दिला आहे.