शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 3 जानेवारी 2023 (11:47 IST)

BJP MLA Laxman Jagtap Dies: आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

jagtap laxman
भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे मंगळवारी सकाळी प्रदीर्घ आजाराने रुग्णालयात निधन झाले. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप हे अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघातही शोककळा पसरली आहे.
विधानसभेतील माझे सहकारी आमदार लक्ष्मण जगताप जी यांचं दीर्घ आजाराने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!