सोमवार, 13 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 डिसेंबर 2020 (08:39 IST)

टीका करण्यासाठी भाजपाला भारतरत्न दिला पाहिजे : राऊत

टीका करण्यासाठी भाजपाला भारतरत्न दिला पाहिजे असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत लगावला आहे. भाजपाचे अभ्यासू नेते कुठल्याही विषयावर अमर्याद टीका करु शकतात त्यामुळे त्यांना आता भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे. काही लोकांना पीएचडीची पदवी दिली पाहिजे असं म्हणत संजय राऊत यांनी टीका केली आहे.
 
संजय राऊत म्हणाले “भाजपाला टीका करण्यासंदर्भात भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. टीका करण्यात त्यांचा हात कुणी हात धरु शकत नाही. लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे. ब्रिटनमध्ये काय चाललं आहे बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बऱ्याच महिन्यांमध्ये परदेशात गेलेले नाहीत. त्यामुळे जगात काय सुरु आहे ते कदाचित भाजपाच्या नेत्यांना माहित नसावं. केंद्र सरकारने ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर बंदी का घातली आहे हे कारण जरा अभ्यासू नेत्यांनी तपासावं” असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.