1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 सप्टेंबर 2023 (12:44 IST)

BMC Khichdi Scam Case : खिचडी घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकरांची चौकशी

uddhav thackeray
कोविड बॉडी बॅग घोटाळ्यानंतर आता खिचडी घोटाळा प्रकरणामुळे उद्धव ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहे.आता खिचडी घोटाळा प्रकरणी कारवाई सुरु करण्यात आली असून आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी सुरु करण्यात आली असून या बाबत खासदार गजनान किर्तीकर यांचे सुपुत्र आणि उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अमोल किर्तीकरांची खिचडी घोटाळा प्रकरणात चौकशी करण्यात आली . 
 
गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांच्या चौकशा सुरु आहेत.यात आता अमोल किर्तीकर यांचेही नाव समोर आले आहे. अमोल किर्तीकर हे उद्धव ठाकरे यांच्या गटातून उत्तर पश्चिम लोकसभेसाठी उमेदवार असण्याची शक्यता आहे. 
 
खिचडी घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेनं अमोल कीर्तिकरांना समन्स देऊन बुधवारी चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले. या पूर्वी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सुरज चव्हाण यांचीही चौकशी करण्यात आली.  

कोविडच्या काळात लॉक डाऊन लावण्यात आले असता त्या काळात गरिबांसाठी जेवण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकार कडून घेण्यात आला असून स्थलांतरित कामगारांसाठी खिचडी बनवण्याचं कंत्राट मुंबई महानगर पालिकेनं 52 कंपन्यांना दिलं होत. मात्र या मध्ये घोटाळा केल्याचा आरोप मुंबई महानगर पालिकेकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्हा शाखेने संजय राऊतांचे निकटवर्तीय म्हटले जाणारे सुजित पाटकर आणि इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
 
Edited by - Priya Dixit