कोपरगावमध्ये अवैध कत्तलखान्यांवर बुलडोझर कारवाई; पोलीस आणि पालिका प्रशासनाची संयुक्तपणे कारवाई
महाराष्ट्रातील कोपरगावमध्ये पोलीस आणि पालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई करत बुलडोझरच्या साहाय्याने अंदाजे ५० अवैध कत्तलखाने आणि अतिक्रमणे पाडली. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोपरगावमध्ये गोमांस सापडल्यानंतर पोलीस आणि पालिका प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई करत छपराखाली चालणारे अंदाजे ५० कत्तलखाने पाडले. मंगळवारी सकाळी झालेल्या या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली. ही कारवाई बकरीदच्या निमित्ताने करण्यात आली. संजयनगर, आयेशा कॉलनी आणि बैल बाजार रोड परिसरात गायींची कत्तल होत असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या घटनेची पडताळणी केली असता, आयेशा कॉलनी, संजयनगर परिसरात २०० किलो गोमांस सापडले. पोलिसांनी मांस जप्त केले.
यानंतर, पालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे ही कारवाई केली. ही बेकायदेशीर कत्तलखाने पाडण्याची मोहीम आज सकाळपासून सुरू आहे. जिथे गोहत्या होत होती, ती पत्र्याची शेड आणि घरे पाडून ही बेकायदेशीर कत्तलखाने हटवण्याची कारवाई आज सकाळी सुरू झाली. या कारवाईपूर्वी, प्रशासनाने सोमवारी सर्व संबंधितांना नोटीस पाठवून अतिक्रमणे हटवण्याचे कडक आदेश दिले होते. मात्र, अतिक्रमणे हटवण्यासाठी स्वतःहून कोणतीही हालचाल न झाल्याने ही कारवाई करण्यात आली.
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: मुंबईतील अनेक निवासी सोसायट्यांमध्ये बकरीदच्या बळीवरून वाद तीव्र झाला; भाजप नेत्याचा कारवाईचा इशारा

