सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (23:25 IST)

दोनशे एकर ऊस जळून खाक

fire farm
जालना जिल्ह्यात शॉर्टसर्किटमुळे दोनशे एकर ऊसाला भीषण आग लागल्यची घटना घडली आहे. या घटनेत कोट्यवधी रुपयांचं शेतकर्‍यांचं नुकसना झाल्याचे समजते. दरम्यान अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांनी वेळीच घरातील नागरिकांना व गोठ्यातील जनावरांना बाहेर काढल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही.

ढवळी-वड्डी कुटवाड रस्ता येथील काही शेतकऱ्यांच्या ऊस शेतीला आग लागली. काही क्षणातच ही आग शेजारील अन्य उसाच्या शेतापर्यंत पोहोचली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली; पण आगीने थोड्याच अवधीत रुद्रावतार धारण केले. दोन तासात बघता बघता परिसरातील सुमारे दोनशे एकर ऊस शेतीला आगीने आपल्या कवेत घेतले.अग्निशमन दल फौजफाट्यासह घटनास्थळी त्वरित दाखल झाले. आग लागलेल्या परिसरात काही नागरिकांची घरे व जनावरांचे गोठे आहेत. शेतानजीक त्यांचे वास्तव्य असल्याने त्यांना आगीचा धोका होता. यामुळे अग्निशमन दलाचे जवान लिंगप्पा कांबळे अमोल गडदे व तानाजी पाटील यांनी घरातील सर्व नागरिक व गोठ्यातील जनावरांना बाहेर काढले. यामुळे घरे व गोठे सुरक्षित राहिले.