सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मांजरीला जिवंत जाळले, अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल

मुंबईतील ओशिवरा येथे एका अनोळखी व्यक्तींनी मांजरीला जिवंत जाळले आहे. याप्रकरणी स्थानिक प्राणीप्रेमींनी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मांजरीच्या शवविच्छेदन अहवालानंतर तपास करुन अज्ञात व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.
 
ओशिवरा येथील गावदेवी इमारतीच्या मागील बाजूस मृतावस्थेत मांजर आढळून आली. या मांजरीला उपाशी ठेवण्यात आलं होत. तसेच तिला बांधून त्यानंतर तिला जिवंत जाळण्यात आलं, असं सांगण्यात येत आहे. तसेट ज्या ठिकाणी मांजरीला जाळण्यात आलं त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे देखील नाहीत. त्यामुळे या घटनेचा छडा लावण्यात अडचणी निर्माण होत आहे. तसेच या मांजरीचे शल परळ येथील रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवण्यात आलं असल्याची माहिती ‘बेजुबान पब्लिक वेलफेअर ट्रस्ट’च्या हेमा चौधरी यांनी दिली. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.