शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 एप्रिल 2017 (11:24 IST)

शाळेच्या बसला अपघात 40 विद्यार्थी गंभीर जखमी

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात शाळेच्या बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसचालकाचा मृत्यू झाला असून 40 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जुनोनी माध्यमिक हायस्कूलची ही बस होती. विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना बस उलटून हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यात खड्डा आल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस पलटी झाली. नंदेश्वर ते जुनोनी मार्गावरसकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.