1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Cab driver arrested for beating up elderly man in Thane

ठाण्यात रस्त्यावर थुंकण्यापासून रोखल्याबद्दल वृद्ध व्यक्तीला मारहाण केली; मुख्यमंत्रींच्या हस्तक्षेपनंतर कॅब चालकाला अटक

Thane
ठाण्यात एक धक्कदायक प्रकार घडला आहे. कॅब चालकाने एका वृद्ध व्यक्तीला कानशिलात लगावली आणि ठोसे मारले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपी कॅब चालकाला अटक करण्याचे पोलिसांना कडक आदेश दिले.
 
मिळालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यात थुंकण्याच्या विरोध केल्याबद्दल ७० वर्षीय वृद्धाला मारहाण करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत आरोपी कॅब चालकाला अटक केली आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळी विवियाना मॉलजवळील ज्युपिटर हॉस्पिटलबाहेर घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल प्रचंड झाला असून, त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिसांना निर्देश 
या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ही घटना गंभीर असल्याचे म्हटले आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे पोलिसांना कडक निर्देश दिले. पीडित व्यक्तीची ओळख सरोश दस्तूर अशी पटली आहे. 
पोलिसांच्या माहितीनुसार, कॅब ड्रायव्हरने त्या वृद्ध व्यक्तीच्या डोक्यावर दगड आणि झाडांच्या फांद्यांनी हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, जनतेमध्ये संतापाची लाट पसरली. ठाणे आमदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आणि आरोपीविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश शहर पोलिसांना दिले.  तसेच आरोपीला बुधवारी अटक करण्यात आली.  
 
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा