शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: आळेफाटा , गुरूवार, 24 ऑगस्ट 2017 (08:44 IST)

नगर-कल्याण महामार्गावरील दुर्घटना : तिघांचा होरपळून मृत्यू

येथून जवळच असलेल्या वडगाव आनंद (ता. जुन्नर) जवळ कल्याण-अहमदनगर महामार्गावर एक मारूती स्वीफ्ट मोटार रस्त्यालगत कठड्याला धडकल्यानंतर पेटल्याने कारमधील तिघांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 22) मध्यरात्रीनंतर छिडच्या सुमारास वडगाव आनंद गावच्या हद्दीत घडली.
 
नरेश सखाराम वाघ (वय 42, रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर), प्रशांत सुरेश चासकर (वय 23, रा. वडगाव आनंद, ता. जुन्नर) आणि दिलीप चंद्रराव नवले (वय 44, रा. बाभूळवाडा, ता. पारनेर, जि. अहमदनगर) अशी मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही परिसरात औषध विक्रेते म्हणून व्यावसायिक आहेत. चालकाला लागलेल्या डुलकीमुळे कार दुभाजकाला धडकली. यानंतर शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.