संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल
मस्साजोग चे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धंनजय देशमुख यांच्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. धंनजय देशमुख यांच्यावर समाधान खिंडकर यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
समाधान खिंडकर आणि त्यांचे मित्र रविवारी रात्री एका हॉटेल मध्ये जेवण करत असताना त्या ठिकाणी रविराज साबळे आणि धंनजय देशमुख जेवण करत असताना समाधान खिंडकर यांनी रील बनवण्यास सुरु केले. हे बघता धनंजय देशमुख यांच्या अंगरक्षकाने समाधान खिंडकर यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतले. माझा फोन का घेतला मला माझा फोन परत द्या असे म्हटले.
तेवढ्यात धंनजय देशमुख तिथे आले आणि अंगरक्षकाची पिस्तूल घेऊन समाधान खिंडकर यांच्या कपाळी लावून तुला जिवंत सोडणार नाही, ठार मारेन अशी धमकी दिली. अशी तक्रार समाधान खिंडकर यांनी पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
Edited By - Priya Dixit
