मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 ऑगस्ट 2025 (14:00 IST)

नेते तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध गडचिरोलीत एफआयआर दाखल

Maharashtra News
सोशल मीडिया साइट X वर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच माहिती समोर आली आहे की, गडचिरोलीत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट टाकल्याबद्दल आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध महाराष्ट्रातील गडचिरोलीत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. खरं तर, गडचिरोलीतील भाजप आमदार मिलिंद रामजी नरोटे यांच्या तक्रारीवरून आरजेडी नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस्वी यादव यांनी सोशल मीडिया साइट X वर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध आक्षेपार्ह आणि अपमानजनक पोस्ट शेअर केल्याचा आरोप आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 196(1)(A)(B), 356(2)(3), 352, 353(2) सारख्या विविध कलमांखाली गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहीत समोर आली आहे. 
Edited By- Dhanashri Naik