शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 (14:21 IST)

9 बकऱ्या खाणारा अजगर पकडण्यात यश

ajagar
चंद्रपूर जिल्ह्यात अर्थ कंझरवेशन ऑर्गनायझेशनला मोठे यश आले आहे. याठिकाणी तब्बल 12 फुट लांब अजगर पकडण्यात यश आले आहे. मागील एका वर्षापासून या अजगराची भिती संपूर्ण परिसराला होती. या अजगराने आतापर्यंत 9 बकऱ्यांना गिळून टाकले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी एकाच परिवारातील चार बकऱ्यांना गिळले आहे.
 
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील उचली गावातील ही घटना आहे. याठिकाणी अजगराने गावकऱ्यांच्या 9 शेळ्या एकामागून एक खाल्ल्या होत्या. 8 ऑक्टोबर रोजी मीनाक्षी ढोंगे यांची चौथी बकरी अजगराने गिळली होती. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
 
शेताच्या आजूबाजूला अजगर असल्याने गावकरी शेतात जाण्यास घाबरत होते. त्यामुळे सर्वजण चिंतेत पडले होते. तर दरम्यान हा अजगर दिसल्यावर अर्थ कंझरवेशन ऑर्गनायझेशन या संस्थेला माहिती देण्यात आली. यानंतर विवेक राखडे, चेतन राखडे, इशान वाठे घटनास्थळी पोहोचले. मात्र, अंधारामुळे आणि नाल्याच्या कडेला असल्याने अजगराला सुखरूप पकडणे अवघड झाले होते. अखेर अजगर पकडण्यात यश आले.
 
या अजगरला पकडण्यात आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात 12 फुट लांब अजगर मिळून आल्याची ही पहिलीच घटना आहे. या अजगरला आज जंगलात सुरक्षित सोडण्यात आले. तसेच या बचाव अभियानात वनपरिक्षेत्र अधिकारी सेमस्कर, वनरक्षक संभाजी बलदे, कृष्णा धोटे आणि गावाचे पोलीस पाटील संघर्ष जगजापे यांचे सहकार्य मिळाले.