माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे स्मारक उभारण्याची केंद्र सरकारने केली घोषणा, जागा लवकरच ठरणार
New Delhi News: माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय राजधानीत स्मारक उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच गृह मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आणि सांगितले की, शुक्रवारी सकाळी काँग्रेस अध्यक्षांकडून डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा देण्याची विनंती करण्यात आली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली की सरकार लवकरच स्मारकासाठी जागा देईल. स्मारक उभारण्यासाठी योग्य जागा शोधण्यासाठी काही दिवस लागतील, असेही ते म्हणाले. स्मारकाबाबत कुटुंबानेही सरकारशी सहमती दर्शवली आहे.
मिळालेल्या महतीनुसार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कार आणि स्मारकाबाबत चर्चा केली होती आणि माजी पंतप्रधानांचे स्मारक बांधण्याची विनंती केली होती. याप्रकरणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिले होते, पण गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात माजी पंतप्रधानांवर शनिवारी सकाळी 11.45 वाजता निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. स्मारकाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. तर काँग्रेसने माजी पंतप्रधानांवर ज्या ठिकाणी स्मारक उभारले जाईल, त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार करावेत, अशी मागणी केली होती.