अधिग्रहणाद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद
Cessation of water supply by acquisition जून महिना संपून जुलै महिना सुरू झाला तरी अद्याप दमदार पाऊस न झाल्याने ग्रामीण भागाला पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. जिल्हयात पाऊसभावी आजूनही नदी, नाले, ओढे कोरडेच आहेत. जिल्हयात मध्ये ग्रामीण भागातील ४७ गावे व १९ वाडयांना ६६ अधिग्रहणाद्वारे होणारा पाणी पुरवठा मुदत संपल्याने दि. १ जुलै पासून बंद झाला आहे. ज्या गावांना अधिग्रहणाची गरज आहे, त्या गावांना पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करावे लागण्याची शक्यता आहे.
लातूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जानेवारी ते जून पर्यंतचा नियमित स्वरूपाचा टंचाई आराखडा तयार केला होता. त्याचा कालावधीही पूर्ण झाला. मात्र यावर्षी अल निनोचा समुद्र प्रवाहावर परिणाम होऊन यावर्षी मानसूनचा पाऊस उशिरा दाखल होण्याचे संकेत मिळाल्यामुळे ग्रामीण भागात पाणी टंचाई जाणऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जुलै ते ऑगस्ट या कालावधीसाठी ४ कोटी ३४ लाख ८९ हजार रूपयांचा संभाव्या पाणी टंचाई निवारणा करीता विशेष कृती आराखडा तयार आला होता. त्याची अंमलबजावणी दि. १ जुलै पासून सुरू होणे आपेक्षीत होते. मात्र तशा प्रकारचे आदेश प्रशासनाने दिले नसल्याने दि. १ जुलै पासून अधिग्रहणे बंद झाली आहेत.