रविवार, 1 फेब्रुवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 डिसेंबर 2016 (10:16 IST)

बॉम्बे हॉस्पिटलमध्ये परवानगीशिवाय २६ लोक भुजबळांना भेटले

chagan bhujbal
काही दिवसांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना उपचारांसाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तब्बल 26 जणांनी कुठलीही परवानगी न घेता भुजबळ यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली  आहे. यामध्ये आमदार, खासदारांचा समावेश आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. अंमलबजावणी संचलनालयाकडून ही माहिती न्यायालयासमोर सादर करण्यात आली आहे. यातून भुजबळांकडून गैरवापर करण्यात आल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे आता या सगळ्याची अंमलबजावणी संचलनालयाकडून चौकशी करण्यात येणार आहे.