बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 30 ऑक्टोबर 2019 (15:29 IST)

‘चंपा साडी हाय हाय’ म्हणत राष्ट्रवादीकडून 'चंपा' साडी सेंटरचे उद्घाटन

पुण्यात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडमध्ये साडी वाटप केल्याच्या निषेधार्थ  राष्ट्रवादीकडून प्रतिकात्मक चंपा साडी सेंटरचं उद्घाटन करण्यात आले. डेक्कन येथील खंडोजी बाबा चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आणि आमदार चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. ‘चंपा साडी हाय हाय’, ‘आम्हाला हवी विकासाची गाडी, नको आम्हाला चंपा साडी’, यासारख्या घोषणा देत भाजपाच्या साडी वाटपाला विरोध दर्शवला.
 
भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाऊ बीज सणाच्या निमित्ताने एक लाख महिलांना साडी वाटप केलं. त्यावेळी पाटील यांच्या या उपक्रमाचा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेकडून निषेध नोंदविण्यात आला होता.